गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरूच : आणखी एकाला चिरडले

1744

– तीन महिन्यात तिघांचा बळी
The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या धुमाकुळीपासून सुटका मिळता मिळेना. सध्या गडचिरोली तालुक्यात धुमाकुळ माजवत असलेल्या रानटी हत्तीने आणखी एकाला चिरडल्याची घटना शनिवार २५ नोव्हेंबर रोजी रात्रो ८ वाजताच्या सुमारास मरेगाव जवळ घडली. मनाेज प्रभाकर येरमे (वय ३८) रा. मरेगाव असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा व मरेगाव परिसरात गेल्या १० दिवसांपासून रानटी हत्तींचा धुमाकुळ सुरू आहे. अशातच रानटी हत्तींकडून धान पिकाचे नुकसान हाेऊ नये यासाठी शनिवारी रात्रीच्या सुमारास हत्तींना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यासाठी मनाेज प्रभाकर येरमे व इतर काहीजण गेले होते. दरम्यान येरमे हे घराकडे येत असताना हत्तींचा कळप परिसरात वावरत होता त्याच वेळी एका हत्तीने येरमे यांच्यावर हल्ला केला व चिरडून ठार केले. तीन महिन्यात हत्तीने तिघांचा बळीघेतला असून यापूर्वी १६ सप्टेंबर राेजी सहायक वनसंरक्षकांचे वाहनचालक सुधाकर आत्राम, १७ ऑक्टाेबर राेजी गडचिराेली तालुक्यातील दिभना येथील हाेमाजी गुरनुले त्यानंतर आता मरेगाव येथे मनाेज येरमे यांना हत्तीने चिरडून ठार केले. रानटी हत्तीच्या धुमकुळीने नागरिक भयभीत झाले असून वाघापाठोपाठ आता रानटी हत्तीची दहशत निर्माण झाली आहे. रानटी हत्तींवर नियंत्रण मिळविणे वनविभागाला यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रानटी हत्तीपासून अजून किती नुकसान होणार असा देखील सवाल करण्यात येत आहे.©©

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, maregao, moushikhamb, waddha, elephanat attack)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here