कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ ; उभे धान पिक पायदळी तुडविले

1212

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०५ : तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून रानटी हत्तीच्या कळपाचा धूमाकूळ सूरू असून काल रात्रो ते आज पहाटे दरम्यान अरततोंडी, खरमतटोला व देऊळगांव येथील शेतशिवारात जवळपास ५० एकर धान शेतपीक पायदळी तूडवत मोठे नूकसान केले आहे. सदर नूकसानीचे वनविभागाने तातडीने पंचनामे करीत नूकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील खूने यांनी केली आहे.
दादापूरच्या जगंलात जवळपास १० दिवस मुक्काम ठोकल्यानंतर या कळपाने शिवनी शेतशीवारात मोर्चा वळवत येथे सूद्धा नूकसान केले. या नंतर हा कळप चांदागड, घाटी, खैरी मार्गे धान शेतीचे नूकसान करीत काल मध्य रात्री अरततोंडी, खरमतटोला, देऊळगांव या लगत असलेल्या गावातील शेतशिवारात प्रवेश करीत येथील तोनशाहा हलामी, अरविंद दरवडे, विनोद पाटणकर, चंन्द्रशेखर खुणे, घनश्याम मेश्राम, देवानंद नाटके, अतूल नाटके, मोतीराम कूमोटी, पुंडलीक फटिगं तसेच अन्य काही शेतकऱ्यांच्या शेतातील धान पीकात धूमाकूळ माजविल्याने उभे पीक भूईसपाट झाले आहे . यात शेतकऱ्यांचे मोठे नूकसान झाले असून वनविभागाने तातडीने सदर नुकसानीचे पंचनामे करीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील खूणे यांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here