– १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत वन्यजीव सप्ताह
The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांच्या वतीने जनजागृती पर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत १५६ जणांनी सहभाग नोंदविला.
१ ते ७ ऑक्टोबर पर्यंत वन्यजीव सप्ताह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वन्यजीवन विषयी लोकांमध्ये जनजागृती होऊन वन्य प्राण्यांबद्दल आस्था निर्माण व्हावी म्हणून गडचिरोलीच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुले व मुली यांचा वेगळे गट ठेवण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये एकूण ९६ मुले व ६० मुलींनी सहभाग नोंदविला. मुलांमध्ये ०५.०० किमी मध्ये प्रथम नागेश्वर संजय रस्से, द्वितीय अमोल रवींद्र पोरते, तृतीय सूरज साईनाथ बोटरे तर मुलींमध्ये ०३.०० किमी प्रथम पायल दिलीप मांदाळे, द्वितीय जानवी दिलीप हजारे व तृतीय पौर्णिमा आतला हे आले. प्रथम आलेल्या स्पर्धकाला ट्रॅक सूट, द्वितीय स्पर्धकाला स्पोर्ट शूज व तृतीय आलेल्या स्पर्धकाला स्पोर्ट बॅग देण्यात आले. इतर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राने गौरवण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन उपवनसंरक्षक पवन जोंग व विभागीय वन अधिकारी सोनल भडके यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या निमित्ताने उद्घाटन प्रसंगी विभागीय वनाधिकारी (दक्षता) गणेश पाटोळे, सहाय्यक वनसंरक्षक करिष्मा कवडे, सहायक वनसंरक्षक प्रतीक्षा काळे, निवृत्त विभागीय वनाधिकारी शंकर बिलोलीकर तसेच गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण गडचिरोली परीक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी धीरज ढेंबरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपाल देगावे, वासेकर, गड्डमवार, नवघरे, जनबंधू, विद्या उईके, वनरक्षक खुळसंगे, तातावर, अलोने, कांबळे, वाढई, राठोड इत्यादींनी मोलाची मदत केली. या कार्यक्रमासाठी प्रादेशिक व सामाजिक वन विभागाचे वनमजूर तसेच लिपिक सोमलकर, ऑपरेटर मनोज पिपरे, पराग देशपांडे व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. मिनी मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी आर आर टी चमू गडचिरोली वनविभाग, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाकडून मोलाची मदत मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनपाल पेंदोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार वनरक्षक दुर्गमवार यांनी मानले.