The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीसह शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीत सहभागी असून आघाडीने योग्य उमेदवार दिल्यास जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीनिशी काम करण्याचा ठराव पक्षाच्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला.
जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सभागृहात शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. भाई रामदास जराते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघठनेचा आढावा घेण्यात आला. गाव शाखांचा विस्तार, बुथ रचना आणि पक्ष सभासदांसाठी सहकारी संस्थांच्या स्थापनेबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. तसेच इंडिया आघाडीच्या वतीने गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढविण्याची शक्यता असल्याने काॅंग्रेस ने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत विषय असला तरी गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपविरोधी खिंड लढविणाऱ्या आणि माडिया- गोंड समाजातील प्रगल्भ नेतृत्व असलेल्या डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्यास शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने काम करतील असा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस भाई रोहिदास कुमरे, जयश्रीताई जराते, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, क्रीष्णा नैताम, दामोदर रोहनकर, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, निशा आयतुलवार, विजया मेश्राम, चिरंजीव पेंदाम, देवेंद्र भोयर, गणेश हुलके, आत्माराम मुनघाटे, बाळकृष्ण मेश्राम, डंबाजी भोयर, रामदास अलाम, मुर्लीधर गोटा, प्रकाश मडावी, देवानंद साखरे, घनश्याम मडावी, लक्ष्मण शेंडे, हरिदास सिडाम, गायताराम हजारे, आकाश आत्राम, सुरज ठाकरे, रोहिणी ऊईके, कल्पना टिंगूसले, निरुताई उंदिरवाडे, काजल पिपरे, छाया भोयर, वेणू लाटकर, मनिषा हजारे, रिना शेंडे, खुशाली बावणे, सुमन सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.