The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०२ : तालुक्यातील मुरमाडी येथे १ एप्रिल २०२५ रोजी कार्यकर्ता मेळावा व आदिवासी आविका सोसायटीच्या संचालकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रामदास मसराम होते. त्यांच्या वतीने आदिवासी आविका सोसायटीच्या सर्व संचालकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी सामाजिक विकास, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सोसायटीच्या संचालकांना त्यांच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यास माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, विलास बन्सोड, जावेद शेख, विनोद लेनगुरे, जयलाल मार्गीया, छाया कोल्हे, शेवंता हलामी, एकनाथ काटेंगे, नंदू शेडमाके, भास्कर मेश्राम, पुरुषोत्तम चिंचोळकर, सखाराम नैताम, लक्ष्मण डोकरमारे, शालिक परसा, गणेश बोगा, रवींद्र सयाम, प्रकाश डोकरमारे, लक्ष्मण मडावी, दीपक शेन्डे, गोपाल कापगते, सूर्यभान मेश्राम, श्रावण कावळे, मादगु आचला, सुधाकर तुलावी, रंजना परसा, वनिता मडकाम यांसह अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण वातावरणात एकता आणि उत्साहाचे वातावरण होते.
