धानोरा येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

81

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०५ : जागतिक अपंग दिव्यांग दिन हा सर्वत्र ३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिवशी समाजात दिव्यांगा बाबत जनजागृती होण्यासाठी, दिव्यांगाचा सर्वत्रिक विकास होण्यासाठी मदत होईल तसेच दिव्यांगा बाबत समाजात आदर,सहानुभूती, सन्मान,निर्माण होईल त्यांच्या अडचणीवर सहजतेने मात करता येईल यासाठी जागतिक दिव्यांग दिन सर्वत्र जगभर साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने धानोरा येथे ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
दिव्यांग समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र धानोरा अंतर्गत पंचायत समिती धानोरा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी कोमलवार, गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे तसेच जि.प.हायस्कूल येथील मुख्याध्यापक विजय सुरजुसे, जि.प.केंद्र शाळा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय शेडमाके यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गटसाधन केंद्र धानोरा येथील सर्व कर्मचारी वृंद, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मु आ तसेच सर्व कर्मचारी वृंद, जि.प हायस्कूल येथील सर्व कर्मचारी वृंद, जि.प. केंद्र शाळा धानोरा येथील सर्व कर्मचारी वृंद, तसेच प्रियदर्शनी विद्यालयातील मु आ तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित राहून सहकार्य केले.

 

 

3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन
धानोरा तालुका प्रतिनिधी. दिनांक 3 डिसेंबर 2024 हा दिवस जागतिक अपंग दिव्यांग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.
या दिवशी समाजात दिव्यांगा बाबत जनजागृती होण्यासाठी, दिव्यांगाचा सर्वत्रिक विकास होण्यासाठी मदत होईल तसेच दिव्यांगा बाबत समाजात आदर,सहानुभूती, सन्मान,निर्माण होईल त्यांच्या अडचणीवर सहजतेने मात करता येईल यासाठी जागतिक दिव्यांग दिन सर्वत्र जगभर साजरा केला जातो.

दिव्यांग समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र धानोरा अंतर्गत पंचायत समिती धानोरा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय कोमलवार साहेब, गटशिक्षणाधिकारी माननीय सुधीर आखाडे साहेब तसेच जि प हायस्कूल येथील मुख्याध्यापक श्री विजय सुरजुसे सर, जि प केंद्र शाळा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री विजय शेडमाके सर यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हिरवीझेंडी दाखवून प्रभात फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता गटसाधन केंद्र धानोरा येथील सर्व कर्मचारी वृंद, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुआ तसेच सर्व कर्मचारी वृंद, जि प हायस्कूल येथील सर्व कर्मचारी वृंद, जि प केंद्र शाळा धानोरा येथील सर्व कर्मचारी वृंद, तसेच प्रियदर्शनी विद्यालयातील मु आ तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित राहून सहकार्य केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here