The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १५ : तालुक्यातील रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात १३ जानेवारी रोजी क्षयरोग मुक्त भारत अभियनांतर्गत १८८ संशयीत लाभार्थी चे X-ray व्ह्यान द्वारे X-ray काढण्यात आले .
संपूर्ण भारतात १०० दिवसीय क्षयरोग मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रांगी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील ६० वर्ष वयोगटातील स्त्री- पुरुष, जुने क्षयरोगी लाभार्थ्यांचे एक्सरे व्ह्यान द्वारे काढण्यात आले. जेणेकरून संपूर्ण आरोग्य केंद्र परिसरात क्षयमुक करण्यासाठी मदत होईल यासाठी आरोग्य केंद्रातिल सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.संध्या सिंग,डॉ. पूजा धूर्वे, आरोग्य सहाय्यक सुरेश राजगडे, भाऊजी हीचामी, वंदना शेंडे LHV, MPW रायपुरे, मडावी, तसेच वाहनचालक विलास वासनिक उपस्थित होते.