गडचिरोलीसह ‘या’ जिल्ह्यांना तीन दिवस पावसाचा ‘येलो’ अलर्ट

3257

– हवामान विभागाने वर्तविला अंदाज
The गडविश्व
गडचिरोली, १० डिसेंबर : आज पासून पाच दिवसांचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला असून तीन दिवस ‘येलो’ अलर्ट जारी केला केला आहे. यामुळे हवामानात बदल होऊन थंडीचा जोरही वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने नुकताच एक हवामान अंदाज आणि चेतावणी दर्शवली आहे. त्यात नागपूर,वर्धा, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात तुरळक, खूप हलका ते हलका अत्याधिक संभावना, एक ते दोन ठिकाणी मेघागर्जना अशा प्रकारचा तीन दिवसांचा ‘येलो’ अलर्ट जारी केला आहे. तर पाच दिवसामधील उर्वरित दोन दिवसांकरिता ग्रीन अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांवर संकट उभे झाले आहे. तर थंडीचा जोरही वाढण्याची शक्यता आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli Chandrapur Nagpur Bhandara Gondiya Wardha) (‘Yellow’ alert for three days of rain for ‘these’ districts including Gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here