The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २८ : तालुक्यातील राजोली येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना 27 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.
धानोरा येथून बांधकाम साहित्य घेऊन राजोलीला गेलेले ट्रॅक्टर, परतीच्या प्रवासात समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या खाली उतरून उलटले. या अपघातात ट्रॅक्टरवर बसलेला आशिष मन्साराम मडावी (वय २२, रा. मेंढा लेखा) हा तरुण मजूर ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यूमुखी पडला.
या घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Accident #Rajoli #Dhanora #TractorAccident #Fatality #PoliceInvestigation #LocalNews
#अपघात #राजोली #धानोरा #ट्रॅक्टरअपघात #मृत्यू #पोलीसतपास #स्थानिकबातमी
