जि.प. हायस्कुल धानोरा येथील विद्यार्थ्यांनी केले मुंबई दर्शन

208

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २५ जानेवारी : विद्यार्थांना अभ्यासाबरोबर शहराची माहिती व्हावी,पर्यटन स्थळांची माहिती व्हावी सोबत अभ्यासात उपयुक्त माहिती पाहता यावी व साठवता यावे या उद्देशाने १९ ते २३ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील विद्यार्थ्याची शैक्षणिक सहल सन २०२२-२३ सत्रातील मुंबई येथे रेल्वे ने पार पडली. या सहलीत वर्ग ८ ते १० च्या एकूण ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सहलीत विद्यार्थ्यानी शिक्षकासमवेत विविध धार्मिक, ऐतहसिक व पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. यामध्ये गेट वें ऑफ इंडिया, ताज हॉटेल, एलिफंटा गुफा (फेरी ने समुद्री प्रवास), मरीन ड्राईव्ह,गिरगाव चौपाटी, हाजी अली दर्गा, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर,जहांगीर गॅलरी, राणीचा बाग ( पेंग्विन पक्षी), वीर सावरकर, दादर चौपाटी,बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ, आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन, महानगरपालिका, मंत्रालय, विधानभवन, चैत्यभूमी, जुहुबीच इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. जुहूबीच वर मुलांनी स्वतः मित्र, शिक्षकासमवेत सेल्फी घेत प्रत्यक्ष समुद्रातील पाण्याचा आनंद लुटला . तसेच मुंबई येथील प्रसिद्ध पदार्थ वडापाव वर ताव मारला. प्रवासात गाडीमध्ये अंताक्षरी, विविध गाणी गात पाच दिवसीय सहलीचा आनंद लुटत धम्माल केली पुढच्या वर्षी पुन्हा अशीच सहलीत सहभागी होण्याचा मानसही विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला.
या सहलीसाठी पी. व्ही.साळवे (सहल प्रमुख), पी.बी. तोटावार, रजनी मडावी, रेखा कोरेवार, हरीश पठाण यांनी परिश्रम केले.
शाळेच्या यशस्वी सहली बद्दल शाळेचे मुख्याध्यापक डी. टी. कोहाडे, गटशिक्षणाधिकारी व्ही.आर.आरवेली, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष खोबरे, तथा पालकानी अभिनंदन केले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (UPSSSC PET Result) (Southampton vs Newcastle) (Adani) (Bundesliga) (STA vs THU) (‘Police Gallantry Medal’) 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here